मंत्रालयाच्या ‘सहाव्या’ मजल्यातील केबिनमध्ये दडलंय तरी काय? ; आशिष शेलार यांचा सवाल

pooja sanjay aashish

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातआरोप झाल्यानंतर वनमंत्री संजय राठोड जनतेसमोर कधी येतात याची प्रतीक्षा सर्वांनाच लागली आहे. त्यांच्याशी संवाद व्हावा, त्यांच्यावर झालेल्या आरोपा संदर्भाने खुलासा व्हावा म्हणून माध्यमाचे प्रतिनिधी पोहरादेवी याठिकाणी डेरेदाखल आहेत. पोहरादेवी व संत सेवालाल महाराज यांचे दर्शन घेतल्यानंतर राज्य राठोड काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं होतं.

हजारोंच्या संख्येने राठोड समर्थक जमा झाले असून पोलिसांना जमावाला आवर घालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दोन आठवड्यांहून अधिक काळानंतर संजय राठोड हे माध्यमांसमोर आले असून त्यांची पत्रकार परिषद घेऊन गेल्या काही दिवसांपासून होणारे आरोप फेटाळून लावले आहेत.

याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी संजय राठोड यांच्यासह सरकार वर देखील सडकून टीका केलेली आहे. मंत्र्याला वाचवण्यासाठी मंत्रालयाच्या ‘सहाव्या’ मजल्यातील केबिनमध्ये दडलंय काय?, असा सवालही आशिष शेलार यांनी उपस्थित केलाय. आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी संजय राठोड यांच्यावर जोरदार प्रहार केलाय.

‘त्या’ एका व्यक्तीचं नाव वारंवार टेलिफोनिक टॉकमध्ये येतंय. त्या व्यक्तीची उपलब्धता आहे की नाही, तो गायब आहे की नाही ते कळायला मार्ग नाही. ह्या टोपीखाली दडलय काय याच प्रमाणे ह्या मंत्र्याला वाचवण्यासाठी मंत्रालयाच्या ‘सहाव्या’ मजल्यातील केबिनमध्ये दडलंय काय हे समोर यायला हवं, असंही आशिष शेलारांनी अधोरेखित केलंय. बाळासाहेबांची शिवसेना माता भगिनींचं रक्षण हे प्रथम कर्तव्य असं मानणारी होती. मात्र पूजा चव्हाण प्रकरणात संपूर्ण शिवसेना चिडीचूप आहे, असंही ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या