मी जो काही आहे तो महाराष्ट्रामुळेच – अक्षय कुमार

टीम महाराष्ट्र देशा : अभिनेता अक्षय कुमार याला ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ या पुरस्काराने गौरविण्यात आल्यानंतर आपण जे काही आहोत ते महाराष्ट्रामुळेच अशी प्रांजळ कबुली अक्षय कुमार याने दिली. तर ‘मी आजपर्यंत जे काही कमावलेय ते महाराष्ट्रामुळे. मी महाराष्ट्रामुळे इथपर्यंत पोहोचलोय’ असंही यावेळी अक्षय म्हणाला.

Loading...

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्याच्या सभेत अक्षय कुमारच्या कॅनडाच्या नागरिकत्वावरुन केलेल्या टीकेला सुद्धा अक्षय कुमार याने उत्तर दिल आहे. ‘राज ठाकरेंनी कॅनडाच्या नागरिकत्वावरुन केलेल्या टीकेबद्वदल मला वाईट वाटले नाही. लोकशाहीत प्रत्येकाला त्याचं मत व्यक्त करण्याचा हक्क आहे’, अशा शब्दात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.Loading…


Loading…

Loading...