मोदींच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेत नेमकं काय झालं 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्यातील प्रचाराची आज सांगता झाली. यावेळी भाजप कडून दिल्ली येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबर नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. त्यामुळे ही पत्रकार परिषद लक्षणीय ठरली आहे. यावेळी अमित शहा यांनी आता पर्यंत भाजप सरकारने केलेल्या कामाचा सविस्तर आढावा दिला. यावेळी अमित शहा म्हणाले की,मल्टीपार्टी डेमोक्रेटिक सिस्टीमच्या माध्यमातून भाजप पक्ष देशाला पुढे घेऊन जाणार आहे. तर भाजपने गेल्या ५ वर्षात अनेक जनहितकरी योजना राबवल्या आहेत आणि कार्यकाळाच्या शेवटच्या टप्यात देखील आम्ही त्या योजना राबवत आहोत. असे शहा म्हणाले.

देशातला नागरिक हा मोदींच्या नेतृत्वामुळे सुरक्षित आहे. तसेच मोदी सरकारने गेल्या ५ वर्षात महागाई आणि भ्रष्टाचारावर पकड ठेवली आहे. त्यामुळे विरोधकांना देखील प्रचारासाठी महागाई आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा सापडला नाही. असा टोला अमित शहांनी कॉंग्रेसला लगावला आहे.पुढे शहा म्हणाले की, देशाच्या प्रत्यके स्तरावर भाजपने विकास काम केली आहेत. दलित नागरिक , आदिवासी जनता , देशातील महिला यांच्यासाठी अनेक विकास योजना राबवल्या व त्या योजना  यशस्वीपणे पूर्णत्वास नेल्या. तसेच देशाला सामजिकरित्या सक्षम करत असतानाच मोदी सरकारने देशाची आर्थिक स्थिती देखील सुधरवली आहे.

Loading...

देशाची अर्थव्यवस्था ही ६ व्या क्रमांकावर आणली आहे. देश हा सर्वांगाने विकासच्या दिशेने वाटचाल करत असल्याने जनता या निवडणुकीत आमचे ३०० उमेदवार निवडून देणार आहे. तर देशात पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होणार आहे. असा विश्वास शहा यांनी यावेळी व्यक्त केला.या पत्रकार परिषदेला मोदींनी देखील संबोधित केले. मोदी म्हणाले की, पाच वर्षात देशाने मला साथ दिली, सर्व प्रसंगात देश एकजूट होऊन माझ्या पाठिशी राहिला. त्यामुळे मी जनतेला धन्यवाद देण्यासाठी आलो आहे, असं पंतप्रधान मोदींनी नमूद केलं.

२०१४  मध्ये १6  मे रोजी लोकसभेचा निकाल आला आणि १७ मे रोजी सट्टाबाजाराचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे पहिल्याच दिवसापासून इमानदारीची सुरुवात झाली. भारत सर्वात मोठी लोकशाही हे जगासमोर सिद्ध झालं आहे. विश्वाला आपल्याला प्रभावित करायला हवं. जेव्हा सरकार सक्षम होते तेव्हा सर्व सण होतात आणि निवडणुका पण होतात. निवडणूक खूप छान आणि सकारात्मकरित्या झाली, असं मोदी यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या भाषणात स्पष्ट केल आहे.यावेळी पत्रकारांकडून काही प्रश्न विचरण्यात आले. मात्र या प्रश्नांना उत्तर केवळ अमित शहा यांनीच दिली मोदींनी मात्र मौन धारण केले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार