काय होतीस अन् काय झालीस! रुपालीचा फोटो पाहून चाहते झाले आश्चर्यचकित

रुपाली भोसले

मुंबई : अभिनेत्री रुपाली भोसले ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेत खलनायकी च्या भूमिकेत पाहायला मिळते. या मालिकेतील तिची ‘संजना’ ही व्यक्तिरेखा सर्वांच्याच पसंतीस उतरली आहे. रुपाली ने नुकताच आपला थ्रोबेक फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे. तो फोटो पाहून चाहते खरच आश्चर्यचकित झाले आहेत.

नुकताच रुपालीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये रुपालीने अफ्टर-बिफोर असे दोन फोटो शेयर केले आहेत. आधीच्या फोटोमध्ये रुपाली साडी आणि एकदम पारंपरिक रुपात आहे. त्यामध्ये ती खूपच साधी आणि सोज्वळ दिसत आहे. तर आत्ताच्या फोटोमध्ये ती रेड कलरच्या वेस्टर्न गाऊनमध्ये आहे. त्यात ती खूपच बोल्ड आणि स्टाईलिश दिसत आहे.

या दोन्ही फोटोंमध्ये खुपचं मोठा फरक जाणवत आहे. हा फोटो पाहून चाहते रुपालीचं कौतुक करत आहेत. अनेक कमेंट्स आणि लाईक्ससुद्धा या फोटोला मिळत आहेत.

मराठी बिग बॉसमध्ये देखील रुपाली पाहायला मिळाली होती. इथे आल्यानंतर रुपाली आणि पराग यांच्या नात्याची खूप चर्चा झाली. मात्र, रुपालीनं माझं आणि परागचं नात फक्त मैत्रीचं असल्याचं स्पष्ट केलं होतं. सध्या ती अंकित मगरेसोबत रिलेशनशीपमध्ये असून दोघांनीही आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP