तुमच्या खिशातल्या ६ हजार कोटींच्या चेकचं काय झालं ? चंद्रकांत पाटलांचा थेट सवाल

chandrakant patil vs uddhav thackeray

पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जूनपासून १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस मोफत देणार असल्याची घोषणा दोन दिवसांपूर्वी केली आहे. यावेळी त्यांनी लसीकरणाची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकार घेत असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा असून संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लसीकरण वेगाने होण्याची आवश्यकता आहे.

मात्र, नागरिक उत्साही असताना लसींचा मुबलक साठा नसल्याने हिरमोड होत आहे. यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सर्व राज्यांना पूर्णपणे केंद्र सरकार लस पुरवेल, अशी घोषणा सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. तर, राज्यासाठी १२ कोटी लस एकरकमी चेक देऊन खरेदी करू शकतो, असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. आता या १२ कोटी लसींचे तब्बल ६ हजार कोटी रुपये वाचले असून त्यातून चक्रीवादळात नुकसान झालेल्यांना आणि मराठा समाजाला आर्थिक पॅकेज द्यावं, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

‘जसं मागच्या सरकारच्या काळात ते खिशात राजीनामा घेऊन फिरत होते, तसंच लसीकरणाचा 6 हजार कोटी रुपयांच्या चेक खिशात घेऊन फिरत होते. आता मोदींनी १८ वर्षांपुढील लस राज्यांना मोफत देण्याची घोषणा केल्याने त्या चेकचं काय झालं? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केलाय. यासोबतच, ते पैसे चक्रीवादळात ज्यांचं नुकसान झालं त्यांना देणार आहात का? मराठा समाजाला देणार आहात का? असा सवाल देखील त्यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

IMP