‘राज्य चालवता न आलेल्या माणसाने गाडी चालवली यात काय मोठा पराक्रम?’ निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

uddhav

मुंबई : आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्क्मिनीची शासकीय पूजा करण्यात येते. पूजा करण्यासाठी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह सोमवारीच पंढरपूरला रवाना झाले. विशेष म्हणजे ते स्वत: गाडी चालवित पंढरपुरात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबासह विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी उपस्थित राहणार आहेत.

आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्क्मिनीची शासकीय पूजेसाठी उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत जाणार या मुद्द्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी खोचक शब्दात टीका केली आहे.

ते म्हणाले ‘जो माणूस महाराष्ट्र हातात येऊन चालू शकला नाही तो माणूस गाडी चालवत मुंबईबाहेर गेला तर त्यात काय मोठा पराक्रम? विठ्ठलाची कितीही सेवा केली तरी या मुख्यमंत्र्याला विठ्ठल माफ करणार नाही कारण इतक्या सहज पणे महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तीला माफी नाही.’

दरम्यान, ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांचा देखील व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. ते उद्धव ठाकरे यांना आवाहन केले आहे की त्यांनी पंढरपूरला येणे टाळावे. ते म्हणले, सर्व संतांच्या पालख्या पायी जाण्याची प्रथा मोडून काढायची. पालखीसोबत फक्त ५० वारकरी पायी चालू द्या, ही विनंतीही धुडकावून लावायची. पायी चालणाऱ्या वारकऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करायची, पताका, टाळ, चिपळी हिसकावून घ्यायची तरीही पांडुरंगाची महापूजा करण्याचा घाट कशासाठी? मुख्यमंत्र्यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगून विठ्ठलाच्या महापूजेला येऊ नये, असा संताप बंडातात्या कराडकर यांनी व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या