fbpx

लपूनछपून चित्रीकरण काय करता, मीच व्हिडीओ पाठवतो ना – जयंत पाटील

गुहागर: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निर्धार परिवर्तन यात्रा काढण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी नेत्यांकडून सरकारचे वाभाडे काढले जात आहेत. मात्र यामध्येच सरकार पोलिसांकडून विरोधी पक्षांवर लक्ष ठेवत असल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. तसेच लपूनछपून आमच्यावर नजर ठेवण्यापेक्षा मी आपल्याला सभेचे व्हिडीओ पाठवून देतो, असा टोला पाटील यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून काढण्यात आलेल्या निर्धार परिवर्तन यात्रे दरम्यान गुहागरमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभा सुरु असताना पोलिसांकडून चित्रीकरण करण्यात येत होते. यावर आक्षेप नोंदवत जयंत पाटील यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे.

ते म्हणाले कि,मुख्यमंत्र्यांनी पोलीसांनासंपूर्ण परिवर्तनयात्रा चित्रिकरणाचे निर्देश दिले आहेत. अशी लपूनछपून आमच्यावर नजर ठेवण्यापेक्षा मी आपल्याला सभेचे व्हिडीओ पाठवून देतो. किमान तुम्हाला समजेल जनता सरकारवर किती नाराज आहे ते. तसेच सरकारने पोलीसांचा दुरुपयोग करणे थांबवाव.