Daddy D pose म्हणजे नक्की काय ?

daddys d pose,shikhar dhawan

श्रीलंकेत सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात शिखर धवन, केएल राहुल आणि हार्दिक पंड्या यांनी शतकी आणि अर्धशतकी खेळी केल्यानंतर एक विशिष्ट प्रकारे आपला आनंद साजरा केला. व्हिक्टरी किंवा विजयाची दोन बोटांनी खून करून त्यांनी आपला आनंद साजरा केला.

गेले दोन दिवस सुरु असलेल्या या अनोख्या सेलेब्रेशनपाठीमागे नक्की काय कारण आहे याचा चाहत्यांना प्रश्न पडला होता. परंतु याबद्दल तीनही खेळाडूंना ट्विटरच्या माध्यमातून खुलासा केला आहे.

‘Daddy D’ पोज बद्दल केएल राहुलने खुलासा केला. तो म्हणतो जेव्हा शिखर धवन खेळत होता तेव्हा मी तुझ्या खेळीचा दुसऱ्या बाजूने आनंद घेत होतो. शिखर धवनने १२ ऑगस्ट रोजी हार्दिक पंड्या बरोबर शेअर केलेल्या एका फोटोत या पोजला Daddy D pose असे नाव दिले होते.धवनने शतकी खेळी केल्यांनतर थोडा वेळ घेऊन Daddy D pose मध्ये आनंद साजरा केला होता. त्यानंतर ज्या ज्या भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली त्यांनी ही प्रथा पुढे सुरु ठेवली. काल हार्दिक पंड्याने शतकी खेळी केल्यांनतर Daddy D pose दिली होती.

भारतीय संघामध्ये पूर्णपणे नवीन खेळाडू आहेत आणि त्यांचा आनंद साजरा करण्याचा अंदाजही आता नवीन आहे. पूर्वी खेळाडूंच्या दौऱ्यातील गमतीशीर गोष्टींबद्दल अशा गोष्टी पुढे येत नसत. परंतु आजकाल सोशल माध्यमांमुळे अशा गमतीशीर गोष्टी पुढे येऊन चाहत्यांचेही मनोरंजन होत आहे.