‘तुमचे मुंबई मॉडेल काय चाटायचंय? स्वतःच्या बुडाखाली काय जळतेय ते आधी बघा’

nitesh rane

मुंबई: गुजरातचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांनी काल शपथ घेतली. पण रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली? यावरूनच शिवसेनेचे संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाना साधत हेच का ते गुजरात मॉडेल असा खोचक सवाल सामनातून केला आहे. तर यावरूनच भाजपचे नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाना साधला आहे.

गुजरात मॉडेल सोडा, तुम्ही ऐन कोरोना काळात मुंबई पालिका आयुक्त परदेशी का बदलले ते सांगा. असा सवाल करत तुमचे ते मुंबई मॉडेल चे काय चाटायचे आम्ही? अशी खोचक टीका केली आहे. तर स्वतःच्या बुडा खाली काय जळते आहे अगोदर ते बघा. असा सल्ला नितेश राणे यांनी संजय राऊत यांना दिला आहे.

दरम्यान गुजरात राज्य जर विकास , प्रगतीच्या मार्गावर पुढे जात होते , तर मग अशा पद्धतीने रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली ? कोठे काय बदलायचे हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे . भाकरी ही फिरवावीच लागते , पण एखादे राज्य जेव्हा विकास किं वा प्रगतीचे ‘ मॉडेल ‘ असल्याचे आदळआपट करीत सांगितले जाते , तेथे अचानक नेतृत्वबदल घडवला की , मग लोकांच्या मनात शंका निर्माण होतात . भूपेंद्र पटेल यांच्यावर आता गुजरातचा भार पडला आहे . वर्षभरात विधानसभांच्या निवडणुका आहेत . पटेल यांना पुढे करून नरेंद्र मोदी यांनाच लढावे लागणार आहे . गुजरात मॉडेल म्हणायचे ते हेच काय? असा खोचक सवाल सामनातून संजय राऊत यांनी केला आहे. यालाच नितेश राणे यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

महत्वाच्या बातम्या