fbpx

तुम्ही काय म्हणता बेरोजगारी, २ कोटी रोजगार माझ्या खात्यानेच दिले : गडकरी

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधकांकडून बेरोजगारीच्या मुद्द्यावर भाजपला टार्गेट केल जात आहे. याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २ कोटी रोजगार माझ्या खात्यानेच दिले असा दावा करत विरोधकांना उत्तर दिले आहे.

भाजपचा बचाव करताना ‘दोन कोटी रोजगार तर फक्त माझ्या मंत्रालयाने दिले आहेत. माझ्या विभागाने १७ लाख कोटींची कामे दिली आहेत, ती भारत सरकाच्या बजेटपेक्षा अनेक पट जास्त आहे. दोन कोटी रोजगार तर फक्त माझे खातेच देत आहे. त्याचे आकडे आहेत’ असं विधान केल आहे.

दरम्यान, भाजप सरकारने केंद्रात सत्तेत येताना दरवर्षी २ कोटी रोजगार उपलब्ध करु असं आश्वासन दिलं होतं त्यावरुन विरोधकांनी नोटाबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेले असा आरोप केला होता. मग २ कोटी रोजगारांचे झाले काय असा सवाल विरोधकांकडून निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विचारला होता.