तुम्ही काय झक मारत होतात का..? : धनंजय मुंडे

रामदास आठवले यांची भूमिका राज्य सरकारने स्पष्ट करावी अस देखील धनंजय मुंडे म्हणाले

मुंबई : कोरेगाव भीमा प्रकरणावार एकीकडे म्हणतात मराठा क्रांती मोर्चा होता तर कधी म्हणतात बाकीच्या संघटना होत्या तर अश्या वेळी तुम्ही काय झक मारत होतात का..?? असा सवाल विधानपरिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारला केला आहे. कोरेगाव भीमा दंगल प्रकरणावर धनंजय मुंडे बोलत होते. त्याचबरोबर राज्य सरकारने रामदास आठवले यांची भूमिका स्पष्ट करावी अस देखील धनंजय मुंडे यांनी नमूद केले आहे.

धनंजय मुंडेनचा राज्य सरकारला सवाल

घटना घडली त्यावेळी सरकार काय करत होतं? सरकारनं का दुर्लक्ष केलं? जबाबदार लोकांवर सरकार काय कारवाई करणार? हे रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना विचारायला हवं.