मुंबई : गेल्या महिनाभरात शिवसेनेला मोठे झटके बसले आहेत. शिवसेना आमदारांनी बंड केला, सत्तातंर झालं, खासदारांचा देखील वेगळा गट तयार झाला. सर्व बंडखोर आमदार, खासदार स्वत:ला शिवसैनिक, बाळासाहेबांचे शिष्य म्हणत आहे. यातून आता शिवसेना काय शिकली, शिवसेनेची पुढची भूमिका काय असेल, यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते एका वृत्तवाहीनीशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “ज्यांच्यावर जास्त विश्वास ठेवला. त्यांनी विश्वासघात केला. मात्र काम करताना विश्वास ठेवावा लागतो. त्याशिवाय पक्ष पुढे जात नाही. ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे, त्याच्या मनात नेमकं काय चाललय, हे आपल्याला कळत नाही. तो वेगळाच विचार करत असतो. जोपर्यंत स्वार्थ आहे, तोपर्यंत विश्वासघात सुरुच राहील.”
या सर्व प्रकरणात शिवसेना नेतृत्वांचे काही चुकले का? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले. “चुका सगळीकडे होतात, घरात देखील होतात. राजकारणात देखील चुका होतात. याचा अर्थ ज्या पक्षाने भरभरुन दिलं आहे त्यांच्याशी विश्वासघात करणे नाही. जे लोक आज प्रश्न विचारत आहेत. त्यातील काहीजण नगरसेवक पदापासून दिल्लीपर्यंत, मंत्री पदापर्यंत पोहचले. मात्र लालसेपोटी यांनी घाव घातला. बाळासाहेब ठाकरे यांनी माकडांची माणसे केली. माणसांचे सरदार केले आणि त्या सरदाराने शिवसेनेवरती घाव घातला.”
महत्वाच्या बातम्या :
- Udhdav Thackeray : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाच्या ऑफरबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…!
- Chandrakant khaire | बंडखोर आमदारांनी बाळासाहेबांचा शेवटचा आदेश का पळाला नाही – चंद्रकांत खैरे
- Sandipan Bhumre : उद्धव ठाकरे यांच्या वागणुकीमुळे शिवसेना संपली – संदीपान भूमरे
- Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंनी भाजपवर आरोप करत राजीनामा दिला होता, माझ्याकडे क्लिप आहे – उद्धव ठाकरे
- CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना केला ‘असा’ उल्लेख!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<