रामदास कदम हे ‘मातोश्री’चे पगारी नेते, मराठा आरक्षणासाठी त्यांनी काय केलं ?

Nilesh Rane

टीम महाराष्ट्र देशा- ‘मराठा आरक्षणाचं श्रेय नारायण राणे यांचं’, असल्याचं वक्तव्य संभाजीराजे यांनी केल्यानंतर नवा वाद सुरु झाला आहे.नारायण राणे यांची स्तुती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना जरा जास्तच झोंबली. याच मुद्द्यावरून संभाजीराजे यांना कदम यांनी, ‘कुणाची लाचारी करू नका’, असं वक्तव्य केलं होतं. यावरून आता महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पूत्र निलेश राणे यांनी रामदास कदम यांच्यावर टीका केली.

निलेश राणे यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर घणाघाती टीका करताना ‘रामदास कदम यांनी स्वत: मराठा आरक्षणासाठी काही केलं नाही, मुळात ते ‘मातोश्री’चे पगारी नेते आहे’ असं म्हटलं आहे. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.

नेमकं काय म्हणाले निलेश राणे ?

‘रामदास कदमांना दुसरं काय काम आहे?, त्यांनी स्वतः मराठा आरक्षणासाठी काही केलं नाही. आता त्यांच्या पोटात का दुखतंय? रामदास कदम हे ‘मातोश्री’चे पगारी नेते आहे. त्यांना नारायण राणेंवर बोलायचं टार्गेट दिलं आहे. पण ही लोकं काय म्हणतात, त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही’.