Share

Uday Samant । “टाटा एअरबस प्रकल्पासाठी गेल्या सरकारने काय केलं, कागदपत्रांसह पुरावा द्या”; उदय सामंतांचं आव्हान

Uday Samant । मुंबई :  राज्यातील चार मोठ्या प्रकल्पांपैकी तीन प्रकल्प गुजरातला गेले. नुकताच हातून गेलेला टाटा एअर बस (Tata Air Bus) प्रकल्पावरुन राजकारण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर घणाघात केला. राज्यातील वेदांता फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला स्थलांतरीत होण्यामागे राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या सर्व आरोपांना उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी पत्रकार परिषद घेऊन कागदपत्रे सादर करत उत्तरे दिली आहेत.

टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात यावा यासाठी गेल्या सरकारकडून नेमके काय प्रयत्न झाले याचा कागदपत्रांसह पुरावा सादर करा, असं आव्हान उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंना दिलं. “टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी 2020 मध्ये चौकशी केल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या रेकॉर्डवर कुठेही एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न झाले अशी कोणतीही बैठक आणि पत्रव्यवहार दिसत नाही”, असं सामंत यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले, “माझ्याकडे आज काही कागदपत्रे आहेत. वेदांता, एअरबस आणि इतर प्रकल्पाची देखील कागदपत्रे आहेत. सरकार गेल्याबद्दल रागू असू शकतो. पण राग किती खोटं बोलून काढायचा, याला काही बंधनं आहेत की नाहीत?”, असा सवाल त्यांनी केलाय. तो प्रकल्प नागपुरात येण्याबाबत कोणताही निकाल झालेला नसल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं.

“एअरबसच्याबाबत एमआयडीसोबत चर्चा झालेली नव्हती. विहानबाबत चर्चा झाली होती. पण ती स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांची चर्चा झालेली होती. सरकारसोबत चर्चा झालेली नव्हती”, असा खुलासा उदय सामंत यांनी यावेळी बोलताना केला आहे. यावर महाविकास आघाडीकडून काय उत्तर येतंय हे पाहावं लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

Uday Samant । मुंबई :  राज्यातील चार मोठ्या प्रकल्पांपैकी तीन प्रकल्प गुजरातला गेले. नुकताच हातून गेलेला टाटा एअर बस (Tata …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now