भाजप नेत्यानेच उपस्थित केला सवाल, उदयनराजेंचे भाजपसाठी योगदान काय?

पुणे : राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता दिसत आहे. सध्या विधानसभेतील संख्याबळ पाहता भाजपकडून राज्यसभेचे तीन खासदार निवडून जाऊ शकतात. यातील दोन जागांवर उदयनराजे भोसले आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं नाव जवळपास निश्चित झाल असून तिसऱ्या नावावर चर्चा सुरु असल्याची माहिती आहे.

याच पार्श्वभूमीवर राज्यसभेतील सहयोगी खासदार संजय काकडे यांना उदयनराजेंची उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा असल्याचे विचारल्यावर काकडे यांनी उदयनराजेंचे भाजपसाठी काय योगदान आहे, असा सवाल उपस्थित केला. त्यांच्यापेक्षा मी पक्षाच्या वाढीसाठी जास्त प्रयत्न केले आहेत,’ असे काकडे म्हणाले.

Loading...

पुढे बोलताना काकडे म्हणाले, ‘मी पक्ष संघटनेसाठी काय प्रयत्न केले आहेत, हे वरिष्ठांना माहिती आहे. मी पक्षाच्या उपयोगाचा आहे, असे त्यांना वाटत असेल तर ते माझ्या नावाचा नक्की विचार करतील. पुण्यातील विधानसभेच्या जागा येण्यासाठी मी किती कष्ट घेतले आहेत, हे अनेकांना माहिती आहे,’ असे काकडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

दरम्यान, ‘पुणे कॅन्टोन्मेंट येथे भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मी विशेष प्रयत्न केले. पुणे महापालिकेत पक्षाची सत्ता आणण्यासाठी विविध योजना राबविल्या होत्या. ‘पश्चिम महाराष्ट्रातील काही मतदारसंघांची जबाबदारी माझ्यावर होती. तेथेही मी काम केले आहे. या साऱ्याचा विचार पक्षाचे नेते राज्यसभेची उमेदवारी देताना करतील, असा मला विश्वास वाटतो,’ असे संजय काकडे यांनी सांगितले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं