‘इतका काय भुकतोस…’, केआरकेने दिले मिका सिंगला प्रत्युत्तर

मिका सिंग

मुंबई: अभिनेता कमाल रशिद खान याच्यावर ‘राधे’ चित्रपटाच्या रिव्ह्यू संदर्भात अभिनेता सलमान खानने मुंबई कोर्टात मानहानीचा दावा केला. यासंदर्भात अभिनेता कमाल रशिद खानला नोटीस पाठवण्यात आली. त्यामुळे याची एकच चर्चा सुरू झाली होती. सध्या कोणत्या न कोणत्या कारणामुळे त्याची सतत चर्चा होत आहे. नुकतेच केआरकेचं गायक मिका सिंगशी भांडण झालं आहे. मिकाने एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात तो केआरकेवर गाणं बनवतं आहे असं सांगितलं होते. यामुळे हा वाद पेटला आहे.

मिकाच्या एका फॅन क्लबने ‘केआरके कुत्ता है’ या गाण्याचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत “मित्रांनो हे गाणं कसं वाटलं,” अशा आशयाचं ट्वीट केलं आहे. हा टिझर शेअर करत हे गाणं ११ जूनला प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले. मिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

मिकाला प्रत्युत्तर देत केआरकेने एक ट्वीट केले आहे. यात तो म्हणाला की, ‘इतका काय भुकतोस, पुढे येऊन गाणं प्रदर्शित करण्याची हिमत्त नाही? घाबरू नकोस, संकोच न करता कर! माझी इच्छा आहे की तू फक्त एकदा हे गाणं प्रदर्शित कर! मग बघ!,’ असे ट्वीट करत केआरकेने मिकाला धमकी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP