व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमिनसाठी आनंदाची बातमी.

तुम्ही व्हॉट्सअॅप ग्रुपचे अॅडमिन आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, व्हॉट्सअॅप असे काही फिचर घेऊन येत आहे ज्यामुळे ग्रुप अॅडमिनला खूप फायदे होणार आहेत.

Loading...

व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी नेहमीच नवनवीन फिचर्स घेऊन येत असतं. त्याचप्रमाणे आता व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्ससाठी आणखीन नवे फिचर घेऊन येत आहे. चला तर मग पाहूयात काय आहेत हे नवे फिचर…

व्हॉट्सअॅपच्या नव्या फिचर्सचं ट्रायल करणारी वेबसाईट WABetaInfo.comच्या मते, व्हॉट्सअॅप ग्रुपमधील इतर सदस्य ग्रुपचं नाव, आयकॉन किंवा डिस्क्रिप्शन बदलू शकणार की नाही? हे अॅडमिन ठरवू शकणार आहे.

कंपनीने गुगल प्ले बीटा प्रोग्रामच्या माध्यमातून २.१७.३८७ हे लेटेस्ट अपडेटेड व्हर्जन सादर केलं आहे. व्हॉट्सअॅपने ग्रुप मॅनेजमेंटमध्येही खूप सुधारणा केली आहे. त्यामुळे ग्रुप बनवणाऱ्याला इतर कुठलाही ग्रुप अॅडमिन ग्रुपमधून काढू शकत नाही. म्हणजेच ग्रुप क्रिएट करणाराच ग्रुपमधून एक्झिट करु शकतो. इतर दुसरा व्यक्ती डिलीट करु शकत नाही.

सध्या हे अपडेट ट्रायल प्रोसेसमध्ये आहे. ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी अपडेट इनेबल करेल. काही दिवसांपूर्वी आलेल्या रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सअॅपमध्ये नवे अनसेंड फिचर्स येणार असल्याचं म्हटलं होतं. मेसेजिंग अॅप सध्या डिलीट फॉर एव्हरीवन फिचरचं टेस्टिंग करत आहे.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...