अहो आश्चर्यम् ! ‘मिर्झापूर’ वेबसीरीजमुळे तरुणाच्या नोकरीवर गदा

मिर्झापूर

मुंबई: तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या वेब सिरीज, टीव्ही मालिकांत प्रमाणे उत्सुकता ताणून न धरणाऱ्या या वेब सिरीज सध्या आकर्षण ठरत आहेत. यामध्ये 23 ऑक्टोबर ला दुसरा सिजन आलेल्या मिर्झापूर या दोन भाऊ आणि एका गॅंगस्टर वर आधारित असलेली वेब सिरीज मे 2018 मध्ये यामध्ये लेडींग गॅंग्ज मध्ये असलेल्या वैर आणि कटकारस्थान आणि खून खराबा सिरीजच्या पहिल्या सीझन आणि दुसऱ्या सीझनला देखील तरुणाईने डोक्यावर घेतलं.

मिर्झापूर नावाचा उत्तर प्रदेशमध्ये एक जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या नावानेच ही वेबसीरिज बनवण्यात आली. मात्र आता हीच वेबसीरीज एका तरुणाच्या नोकरी मिळवण्यासाठी मोठा अडथळा निर्माण करत आहे. मिर्झापूर येथून मुंबईत नोकरी साठी आलेल्या एका तरुणाला बायोडेटा बघून तू ‘मिर्झापूर’चा आहेस का असा पहिला प्रश्न त्याला विचारला. त्याने हो उत्तर देताच मॅनेजर संतापला आणि थेट त्याला नोकरी नाकारली.

मिर्झापूरचा रहिवासी दीपू प्रजापती मुंबईमध्ये रेस्तराँ चेन चालवणाऱ्या कंपनीत मुलाखतीसाठी गेला होता. पण त्याचा बायोडेटा बघून तो मिर्झापूरचा आहे. या कारणावरून मॅनेजर संतापला इथे कशाला आला आहेस…जा मिर्झापूरमध्ये जाऊनच गुंडागर्दी कर असं म्हणत त्याला नोकरी नाकारली.

या घटनेनंतर त्याने मिर्झापूर वेबसीरिजच्या निर्मात्यांविरोधात मिर्झापूर पोलीस अधिक्षकांकडे लेखी तक्रार केली आहे. तसेच वेबसीरिजचं नाव बदलण्याची मागणीही त्याने केली. जिल्ह्याची प्रतिमा डागाळत असल्याने निर्मात्यांवर कारवाई करावी अशी मागणी करणारं पत्र त्याने राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनाही लिहिलं आहे.

या आधी देखील उत्तर प्रदेश मधील मिर्झापूर या जिल्ह्याचे नाव असलेल्या या वेब सिरीज मुळे जिल्ह्याची बदनामी होत असल्याचे खासदार अनुप्रिया पटेल यांनी म्हटले आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार अनुप्रिया पटेल यांनी यांनी मिर्झापूर सिरीज च्या कंटेंट वर आक्षेप घेतला होता. पटेल यांनी ट्विट करत मिर्झापूर शहराला विनाकारण बदनाम करण्याचे काम सुरू आहे या भागाची खासदार या नात्याने वर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे पटेल यांनी म्हटलं होत.

महत्वाच्या बातम्या