मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर इतर आमदारांनीही बंड करत शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. शिंदे गटात साधारण ४० हून अधिक शिवसेना आमदार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. या सर्व गोंधळात शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील सोशल मीडियावर चर्चेत आहेत. गुवाहाटीत असलेल्या शहाजी बापू पाटील यांची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. यावरुन सोशल मिडीयावर ते ट्रेंडमध्ये आहेत. नेटकरी त्यांच्या या विधानावरून मिश्कील स्वरुपात ट्विट करताना पाहायला मिळत आहेत. आता या प्रकरणी मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी उडी घेतली आहे.
‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’, अशा शब्दात शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांनी गुवाहाटीच्या सौंदर्याचं वर्णन केले आहे. आता या ट्रेंडमध्ये गजानन काळे हे देखील सामील झाले आहेत. “काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल, . . . एकदम,ओक्के कार्यक्रम”, असे ट्विट गजानन काळे यांनी केले आहे.
काय झाडी,
काय डोंगार,
काय हाटेल,
.
.
.
एकदम, ओक्के कार्यक्रम😀 pic.twitter.com/t0q7bKrL6X— Gajanan Kale (@GajananKaleMNS) June 26, 2022
मुंबई, नागपूरसह अनेक शहरांत शिंदे यांच्या विरोधात निदर्शने
महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक रविवारी रस्त्यावर उतरून एकनाथ शिंदे यांचा निषेध करत आहेत. मुंबईतील सामना कार्यालयाबाहेर शिवसैनिकांची गर्दी आहे. नागपूर आणि नाशिकमध्ये बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. भगवे झेंडे घेऊन रॅली काढण्यात आल्या असून शिंदे गटाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या –
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<