वेटर ते सुपरस्टार खिलाडी अक्षयकुमार चा थक्क करणारा प्रवास

अक्षयकुमारच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त खास त्यांचा थरारक जीवन प्रवास

 

वेबटीम-मुंबईत रोज २० हजार लोक  बाहेरून येत असतात त्यातील अनेक लोक हे फिल्मी दुनियेत आपल नशीब आजमवण्यासाठी येतात.पण त्यातली काही मोजकेच इथे आपली ओळख निर्माण करतात आणि तेच खिलाडी म्हणून ओळखले जातात.आज बॉलीवुड चा खिलाडी कुमार म्हणून ओळख असलेल्या अक्षयकुमार चा आज ५० वा वाढदिवस त्याच्या  एकूण आयुष्यावर  टाकलेला हा प्रकाश.

अक्षय कुमारचे खरे  नाव राजीव भाटीया असून तो मूळ दिल्ल्लीचा रहिवाशी आहे.अक्षय चे वडील हे सरकारी नोकरीत होते.अक्षय चा जन्म पंजाब मधील अमृतसर येथे झाला तर त्याचे संपूर्ण बालपण दिल्ली मधील चांदनी चौक च्या गल्लीमध्ये गेले.अक्षय ला लहापणापासून खेळाची प्रचंड आवड होती. मार्शल आर्ट च्या  ट्रेनिंग करता अक्षय बैंकॉक गेला आणि त्याला तिथेच शेफ ची नोकरी मिळाली.

बैंकॉक मध्ये असताना अक्षय ने वेटर पासून ते कार्ड विकण्यापर्यत सर्व काम केली.कामाच्या शोधात अक्षय बांगलादेशात देखील जाऊन आला.कोलकतामध्ये देखील अक्षय ने एका पर्यटन कंपनीत काम केले.त्यांतर तो मायानगरी मुंबईत आला तिथे काही दिवस त्याने कुंदनचे दागिने विकण्याचे काम केले.

गोविंदामुळे राजीव झाला अक्षयकुमार

मुंबईत असताना अक्षय एका प्रसिद्ध फोटोग्राफर कडे काम करत होते.त्या फोटोग्राफर ने अभिनेता गोविंदा चे काही फोटो काढले होते.ते देण्याकरता अक्षय गोविंदाकडे गेला.त्यावेळी गोविंदाने अक्षय ला तूच  चित्रपटात का काम  करत नाही असे विचारले ? त्यावेळी अक्षय कुमार च्या डोक्यात आपण देखील चित्रपटात काम करावे अशी कल्पना आली.

 असा झाला  राजीव भाटीयाचा अक्षय कुमार

अक्षय कुमार ने  महेश भट यांच्या “आज” या चित्रपटात एक ७ सेकंदाचा रोल केला होता.या चित्रपटातील मुख्य हिरोचे नाव अक्षय असल्यामुळे अक्षय ने आपले नाव राजीव बदलून अक्षय केले.खिलाडी हा अक्षय कुमार चा पहिला यशस्वी चित्रपट.या चित्रपटापासून अक्षय ला त्यांची खिलाडी ही ओळख मिळाली.

अक्षय ने अनेक चित्रपटात व काही टीव्ही सिरीयल मध्ये देखील काम केले आहे.त्यांच्या दिल तो पागल है,खाकी,अजनबी,गरम मसाला या सारख्या चित्रपटाना फिल्म फेअर पुरस्कार देखील मिळाले आहे .

You might also like
Comments
Loading...