आजपासून Ola E-scooter ची विक्री सुरू, जाणून घ्या अधिक माहिती

ola

नवी दिल्ली: ओला ई-स्कूटरची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अनेकजण या गाडीच्या प्रतिक्षेत होते. Ola Scooter साठी Pre-booking जेव्हा पासून सुरु करण्यात आली होती. तेव्हा पासून या गाडीची प्रचंड क्रेझ पाहायला मिळाली. अखेर आता नागरिकाची प्रतिक्षा संपणार आहे. आज पासून (१५ सप्टेंबर) ओला ई-स्कूटर ची विक्री सुरू करण्यात आली आहे.

Ola CEO भाविष अग्रावाल यांनी ट्विटरवर विक्री सुरू झाल्याची माहिती दिली आहे. कंपनी मागील आठवड्यात विक्री सुरू करणार होती, परंतु वेबसाईटमध्ये काही तांत्रिक समस्या आल्याने ही विक्री पुढे ढकलण्यात आली होती. Ola Electric Scooter ऑनलाईन खरेदी करण्यासाठी कंपनीच्या वेबसाईटवर जावं लागेल. कंपनीने आपली ई-स्कूटर दोन वेरिएंटमध्ये लाँच केली आहे.

कंपनीने आपली ई-स्कूटर दोन वेरिएंटमध्ये लाँच केली आहे. ज्यात एक S1 आणि दुसरं S1 Pro आहे. Ola ई-स्कूटरचं S1 वेरिएंट बेसिक असून याची किंमत 99,999 रुपये आहे.

तर S1 Pro कंपनीचं टॉप मॉडेल वेरिएंट असून याची किंमत 1,29,999 रुपये आहे. विशेष म्हणजे, यावर 20000 रुपयांपर्यंत सबसिडीचा फायदा मिळू शकतो. हा फायदा FAME-2 स्कीम आणि स्टेट सबसिडी अंतर्गत घेता येऊ शकतो. यासाठी डिलीव्हरी ऑक्टोबर 2021 पासून सुरू होणार आहे.

इलेक्ट्रिक स्कूटरच्या अ‍ॅडव्हान्स वर्जन S1 Pro साठी EMI 3199 रुपयांपासून सुरू होणार आहे. HDFC बँक ओला आणि ओला इलेक्ट्रिक अ‍ॅपवर ग्राहकांना काही मिनिटांत Pre-Approved Auto Loan उपलब्ध करुन देणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या