पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त; चंद्रकांत पाटलांना मोठा धक्का

chandrkant patil

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून या समितीच्या बरखास्तीची चर्चा होती. त्यानंतर आता अखेर सरकारने याबाबतचा अध्यादेश काढला आहे. सरकारचा हा निर्णय भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण भाजपचे महेश जाधव हे या समितीच्या अध्यक्षपदी होते.

राज्यात 2019 मध्ये शिवसेना – राष्ट्रवादी व कॉंग्रेस यांचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर गेल्या दीड वर्षात या सरकारने भाजपाचे अध्यक्ष व सदस्य असलेल्या राज्यस्तरीय समित्या व महामंडळे बरखास्त करून तेथे तीन पक्षांच्या कार्यकर्त्यांची वर्णी लावण्याचा धडाका लावला आहे.

दरम्यान,16 ऑगस्ट 2017 रोजी राज्य शासनाने समितीच्या अध्यक्षपदी महेश जाधव यांची तर सदस्य म्हणून शिवाजी जाधव, वैशाली क्षीरसागर, राजाराम गरूड, राजेंद्र जाधव, चारूदत्त देसाई यांची नियुक्ती करण्यात आली. गेली चार वर्षे या समितीमार्फत कामकाज सुरू होते.

दरम्यान,प.महाराष्ट्र देवस्थान समितीवर भाजपनियुक्त अध्यक्ष व सदस्यच कार्यरत होते. आज राज्य शासनाने अध्यक्षांसह समितीचा कार्यकाल संपुष्टात आणून जिल्हाधिकारी यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार देत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनाच धक्का दिल्याचे बोलले जाते. आता जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :