ENG vs WI | इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी वेस्टइंडीज महिला क्रिकेट टीम जाहीर

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज (ENG vs WI) यांच्यामध्ये होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ (West Indies Women Cricket Team) जाहीर झाला आहे. ही मालिका 4 आणि 6 डिसेंबर रोजी अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळली जाणार आहे. या मालिकेमधील वेस्टइंडीज संघातील किसिया नाइट आणि शेमन कॅम्पबेल यांचे पुनरागन झाले आहे.

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पार पडणाऱ्या महिला एकदिवसीय मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघातील किसिया नाइट आणि शेमन कॅम्पबेल यांचे दुखापती नंतर संघामध्ये पुनरागमन झाले आहे. दरम्यान, संघामध्ये अनुभवी अष्टपैलू खेळाडू स्टेफनी टेलर नसणार आहे. कारण स्टेफनी न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये जखमी झाली होती. स्टेफनी अजून त्या गुडघ्याच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेली नाही.

वेस्टइंडीज महिला क्रिकेट संघाचे मुख्य निवडता करते अँन ब्राऊन-जॉन म्हणाले आहे की,”दुखापतीमुळे मागील मालिका गमावल्यानंतर किसिया नाइट आणि शेमन कॅम्पबेल यांचे वन डे संघामध्ये पुनरागमन झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये स्टेफनी टेलरच्या अनुपस्थितीमध्ये संघ मजबूत होईल. सप्टेंबर महिन्यात झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेमध्ये स्टेफनी जखमी झाली होती.त्या दुखापतीतून अजून ती सावरत आहे.”

पुढे ते म्हणाले की,”CG युनायटेड एक दिवसीय सामने आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण 2025 मध्ये होणाऱ्या आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र होण्यासाठी आम्हाला हे सामने जिंकले खूप गरजेचे आहे.” न्यूझीलंडविरुद्ध सप्टेंबरमध्ये झालेल्या मालिकेमध्ये 2-1 ने पराभूत झाल्यानंतर वेस्टइंडीज आयसीसी महिला चॅम्पियनशिपमध्ये पाचव्या स्थानावर पोहोचले आहेत.

इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी वेस्टइंडीज संघामध्ये हेली मॅथ्यूज (सी), शकेरा सेलमन (वीसी), आलिया अॅलेने, शेमन कॅम्पबेल, अॅफी फ्लेचर, चेरी-अॅन फ्रेझर, शबिका गजनाबी, शेनाटा ग्रिमंड, चिनेल हेन्री, कैसिया नाइट, करिश्मा नाईट, करिश्मा रामहारक, केशिया शुल्झ आणि रशादा विल्यम्स या खेळाडूंचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या 

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज (ENG vs WI) यांच्यामध्ये होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ (West Indies Women Cricket …

पुढे वाचा

Cricket Sports