रोहित शर्माला विश्रांती नाहीच, वेस्टइंडिज विरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय संघ जाहीर

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय क्रिकेट संघाचा ताडाखेबाज सलामीच्या फलंदाज रोहित शर्मा याला पुढील महिन्यात होणाऱ्या वेस्टइंडिज विरुद्धच्या मालिकेत विश्रांती देणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या मात्र रोहितला एक दिवसीय आणि टी-20 मालिकेसाठीच्या संघात स्थान देण्यात आले आहे.

बांगलादेशाविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेनंतर ‘टीम इंडिया’ मायदेशात एकदिवसीय व टी-20 मालिकेत वेस्ट इंडीजशी भिडणार आहे. या मालिकेसाठी हिंदुस्थानी संघाची गुरुवारी 21 नोव्हेंबरला घोषणा करण्यात आली.

Loading...

विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा संघ वेस्ट इंडीजशी दोन हात आहे. परंतु एक दिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघामध्ये फक्त एक बदल करण्यात आला आहे. एक दिवसीय मालिकेसाठी केदार जाधवला संघात स्थान मिळाले आहे, तर टी-20 मालिकेसाठी वाशिंग्टन सुंदरला संधी मिळाली आहे. तसेच भुवनेश्वर कुमारने संघात पुनपागमन केले आहे.

एक दिवसीय मालिकेसाठी संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, केदार जाधव, रविंद्र जाडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार

टी-20 मालिकेसाठी संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वाशिंग्टन सुंदर, रविंद्र जाडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?