Share

T20 World Cup | वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरन भावुक, म्हणाला…

T20 World Cup | नवी दिल्ली : T20 विश्वचषकातील सुपर 12 टप्प्यापूर्वी वेस्ट इंडिज संघ बाहेर पडणे आश्चर्यकारक आहे. आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाला पराभवासह बाहेर पडावे लागले होते. या पराभवानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरन दुखावला गेला आहे. यावेळी निकोलस पूरन म्हणाला की हे कठीण आहे, आम्ही या स्पर्धेत अजिबात चांगली फलंदाजी केलेली नाही, असं तो म्हणाला.

पुढे पूरन म्हणाला कि, खरोखर चांगल्या फलंदाजीच्या ग्राऊंडवर 145 धावा झाल्या. आता १४५ धावांच्या आता समोरच्या टीमला रोखणं हे गोलंदाजांसाठी खरोखर कठीण काम आहे. ते एक आव्हान होते. अभिनंदन आयर्लंड, त्यांनी आज चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी केली. जेसन चांगली गोलंदाजी करत आहे, किंग शानदार फलंदाजी करत आहे, जोसेफ चांगला खेळात आहे. हा आमच्यासाठी शिकण्याचा अनुभव आहे. आम्ही आमच्या चाहत्यांची आणि स्वतःची निराशा केली आहे. हे नक्कीच दुखावणार आहे.

विशेष म्हणजे वेस्ट इंडिजसाठी हा करो किंवा मरो असा सामना होता. त्यात ते अपयशी ठरले. प्रथम फलंदाजी करताना विंडीजने 5 गडी बाद 146 धावा केल्या. ब्रेंडन किंगने 62 धावांची नाबाद खेळी खेळली पण त्याचा स्ट्राईक रेट चांगला नव्हता. आयर्लंड संघाकडून डेलानीने ३ बळी घेतले. प्रत्युत्तरात आयर्लंडने तुफानी फलंदाजीचे प्रदर्शन केले. आयर्लंड संघाने 18 व्या षटकात 1 गडी बाद 150 धावा करत सामना जिंकला. पॉल स्टर्लिंगने नाबाद 66 धावा केल्या. विंडीज संघाला पात्रता फेरीत दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच ते या स्पर्धेतून बाहेर पडले.

महत्वाच्या बातम्या :

T20 World Cup | नवी दिल्ली : T20 विश्वचषकातील सुपर 12 टप्प्यापूर्वी वेस्ट इंडिज संघ बाहेर पडणे आश्चर्यकारक आहे. आयर्लंड …

पुढे वाचा

Cricket India Maharashtra Marathi News Sports

Join WhatsApp

Join Now