या क्रिकेटपटूने पदार्पणातचंं केली अनोख्या विक्रमाची नोंद

टीम महाराष्ट्र देशा:- भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याला शुक्रवारी सबिना पार्क येथे सुरुवात झाली.याच कसोटी सामन्यात रहकीम कोर्नवॉलने पदार्पणातच अनोख्या विक्रमाची नोंद केली. विंडीज कर्णधाराने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दुसऱ्या सामन्यात कर्णधाराने आपल्या ताफ्यात कॉर्नवॉलला संधी दिल्याचे जाहीर केले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६ फूट ६ इंच उंचीच्या आणि जवळपास १४० किलो वजन असणाऱ्या कॉर्नवलचा संघात समावेश होतात क्रिकेटच्या इतिहासात एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली. आतापर्यंतच्या क्रिकेटमध्ये तो सर्वाधिक वजन असणारा खेळाडू आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया के वारविक आर्मस्ट्राँग (१३३-३९ किलो) याचा विक्रम मोडीत काढला. क्रिकेटच्या १४२ वर्षांच्या इतिहासातील रहकीम सर्वाधिक वजन असलेला खेळाडू आहे. आर्मस्ट्राँगने १९०२ पासून १९२१ दरम्यान एकूण ५० स्थानिक कसोटी सामने खेळले होते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कॉर्नवॉलने पदार्पण केले असून तो विंडीजचे किती सामन्यात प्रतिनिधीत्व करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. यापूर्वी ड्वेन लेवेरोक (१२७ किलो) याने २००७ च्या विश्वचषकात बरमुडा राष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले होते.दरम्यान रहकीम कोर्नवॉलने त्याच्या पहिल्याच कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारला करून आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिला बळी मिळवून सर्वांना चकित केले आहे.