विंडीजला धक्का,दुखापतीमुळे ‘हा’ अष्टपैलू खेळाडू मालिकेतून बाहेर

टीम महाराष्ट्र देशा- भारताविरुद्ध 3 टी-20 मालिकेआधीच विंडीजला मोठा धक्का बसला आहे. विंडीजचा अष्टपैलू खेळाडू अँड्रे रसेल टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. अँड्रे रसेलसोबत अॅश्ले नर्स आणि सुनिल नरीन हे खेळाडूदेखील मालिकेत उपलब्ध नसणार आहेत.

आज कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर आज पहिला टी-20 सामना रंगणार आहे.अफगाण प्रिमीअर लीग स्पर्धेत खेळत असताना रसेलला दुखापत झाली होती, या दुखापतीमधून तो अजुन सावरु शकलेला नाही.त्यामुळे भारताविरुद्ध 3 टी-20 सामन्यांमध्ये तो सहभागी होणार नाही.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...