काही राजकीय पक्षांनी मला जीवे मारण्याची सुपारी दिली ; ममता बनर्जींचे धक्कादायक विधान

MAMATA

टीम महाराष्ट्र देशा : काही राजकीय पक्षांनी मला मारण्यासाठी सुपारी दिली आहे. ते मला माझ्या राहत्या घरी मारण्याची शक्यता आहे. अस धक्कादायक विधान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केल आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केल आहे.

Loading...

मला माहिती मिळाली आहे की माझ्या राहत्या घरात घुसून मला मारण्याचा प्लॅन काही पक्षांनी केला आहे. या वेळी त्यांनी उच्च अधिकाऱ्यांनी मला सुरक्षित सरकारी निवासस्थानात शिफ्ट होण्यास सांगितले आहे. दरम्यान, मी असल्या धमक्यांना घाबरत नाही असे ममता बॅनर्जींनी सांगितले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.Loading…


Loading…

Loading...