fbpx

हिंदुनो गुजरात सारखे पश्चिम बंगालमध्ये सडेतोड उत्तर द्या: भाजप आमदार राजा सिंह

bjp mla raja singh

वेबटीम: तेलंगणाचे भाजप आमदार राजा सिंह आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठीं ओळखले जातात . आता पुन्हा एकदा चिथावणी देणाऱ्या वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत.पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणि दंगलीचा हवाला देत राजा सिंह यांनी पश्चिम बंगालमधील हिंदू जागे झाले नाही तर काश्मीरमधून हिंदुंना ज्या पद्धतीने पळवून लावण्यात आले. त्याचपद्धतीने पश्चिम बंगालमधील हिंदुंना बाहेर काढून बांगलादेश सारखे राज्य बनवतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

यांच्या या चिथावणीखोर वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.  एका फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी हा संदेश पाठवला आहे. यापूर्वी राजा सिंह हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहिले आहेत. राजा सिंह यांनी शुक्रवारीच हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. आतापर्यंत सुमारे ६० हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. गोशामहल विधानसभा मतदारसंघातून ते प्रथमच निवडून आले आहेत. यापूर्वी त्यांनी हैदराबादमध्ये बीफ फेस्टिवलला विरोध केला होता

राजा सिंह नक्की काय म्हणाले आहेत?

आज बंगालमध्ये हिंदू सुरक्षित नाहीत. तेथील सरकार दंगेखोरांना सूट देत असल्यामुळे तिथे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला. आता तेथे गुजरातमध्ये ज्या पद्धतीने हिंदुंनी संघटीतपणे उत्तर दिले होते. तसेच उत्तर देण्याची आज गरज असल्याचे आवाहन त्यांनी केले.  आतापर्यंत बंगालच्या हिंदुंनी चांगला लढा दिला आहे. जेथे जेथे दंगल झाली. तिथे हिंदुंना वाचवण्यात आले आहे. बंगालमध्ये जर हिंदुंना सुरक्षित राहायचे असेल तर त्यांनी संघटित आणि जागृत होण्याची गरज आहे. जर हिंदू एकजुट झाले नाही, तर ज्या प्रमाणे काश्मीरमधून त्यांना पळवून लावण्यात आले. त्याचपद्धतीने बंगालमधून पळवून लावून हे लोक बांगलादेशसारखे वेगळे राज्य बनवतील, असा इशारा दिला.मी बंगालमधील हिंदुंना आवाहन करतो की, जागे व्हा, संघटित व्हा. वर्ष २००२ मध्ये हिंदुंना मारण्यात आले होते, हे सर्वांना लक्षात असेलच. त्यावेळी हिंदुंनी संघटितपणे दंगेखोरांना जे उत्तर दिले होते. आज तशाच पद्धतीची आवश्यकता आहे, असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले.

दरम्यान, पश्चिम बंगालच्या २४ परगणामध्ये गेल्या काही दिवसांपासून दोन समुदायामध्ये हिंसक घटना घडत आहेत. यावरून भाजप आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेस यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला पोहचला आहे.

[jwplayer 3iucNS6Q]