अमित शहा देवापेक्षा मोठे आहेत का?, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आक्रमक

टीम महाराष्ट्र देशा: भाजप अध्यक्ष अमित शहा हे त्यांच्या विरोधात आंदोल न करायला देवापेक्षा मोठे आहेत का? असा सवाल पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. मंगळवारी कोलकातामध्ये तृणमूल कॉंग्रेस आणि भाजप समर्थकांत झालेल्या तुफान राड्यानंतर ममता यांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. तर दुसरीकडे बंगालमध्ये गॅंगस्टरचं सरकार असून बॅनर्जी यांनी लोकशाही संपवली आहे, असा आरोप भाजपकडून केला जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यातील मतदानाला चार दिवस उरले आहेत, मात्र राजकीय पक्षांमधील प्रचाराचा संघर्ष आता हिंसाचार बदलताना दिसत आहे, मंगळवारी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांदरम्यान तुफान राडा. त्यामुळे पश्चिम बंगालमधील वातावरण तापले आहे.

दगडफेकीच्या घटनेनंतर बॅनर्जी यांनी विद्यासागर कॉलेजमध्ये जात ईश्वरचंद्र विद्यासागर यांची प्रतिमा तोडफोड विरोधात रॅली काढण्याची घोषणा केली आहे, विद्यासागर यांच्या प्रतिमेला हात लावल्याने पश्चिम बंगालच्या अस्मितेला धक्का लागल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, विद्यासागर यांचा पुतळा तोडणारे लोक भाजपचे केवळ मतदानासाठी आणलेले गुंड असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.

कोलकातामध्ये नेमक काय घडल

कोलकातामध्ये अमित शहा यांची मंगळवारी सभा होणार होती, सभेआधीच बंगाल पोलिसांनी जात परवानगीचे कागदपत्र मागितले. मात्र, कागदपत्र ने देऊ शकल्याने थेट सभामंडप तोडण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे भाजपाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. दुसरीकडे शहा यांची रॅलीसुरु झाल्यानंतर ट्रकवर काठ्या भिरकावल्याने वातावरण तापले. यावेळी तुफान दगडफेक करत जाळपोळ करण्यात आली.