चक्क ! खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे एकाच व्यासपीठावर

shivendra - udayanraje

सातारा : खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे हे गेल्या काहीदिवासंपासून एकमेकांवर तुफान शाब्दिक हल्ले चढवत आहेत. “कधी शिवेंद्रसिंहराजे खलनायक, तर उदयनराजे बिनदाढीचे प्रेम चोप्रा” अशे खमके टोले दोघांनी एकमेकांना लगावले. मात्र हे दोन्ही राजे साताऱ्यात एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे रविवारी रात्री एकाच मंचावर आले. उपस्थितांना एकच उत्सुकता होती. दोन्ही राजे आपसात बोलतील का? मात्र त्यांची निराशा झाली. सातारा जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ रविवारी आयोजित करण्यात आला होता. उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे या दोघांमध्ये त्यांचे काका शिवाजीराजे भोसले बसले होते.

सुरुवातीला काकांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. मात्र त्यावेळी शिवेंद्रसिंहराजे आणि उदयनराजेंचे यांनी एकमेकांकडे पहिले सुद्धा नाही. सोहळ्यातील पालकांनाही आपल्या मुलाच्या बक्षिसापेक्षा दोन्ही राजेंच्या हालचालीतच अधिक इंटरेस्ट होता. सोहळा संपल्यानंतर दोन्ही राजे निघून गेले.