चक्क विहीरच गेली वाहून, वाचा नेमकं झालं काय ?

टीम महाराष्ट्र देशा : पुणे आणि परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे शहरातील ओढे आणि पुरंदर, बारामतीमधून वाहणाऱ्या कऱ्हा नदीने रौद्र रूप धारण केल्याने उडालेल्या हाहाकारात २० जणांचा बळी गेला. ९००च्या वर जनावरेही मृत्युमुखी पडली असून हजारो वाहनांचे नुकसान झाले आहे.

तसेच मुसळधार पावसामुळे बारामती तालुक्यातील कऱ्हा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. जवळपास 10 वर्षानंतर कऱ्हा नदीत पूरस्थिती निर्माण झाली. कऱ्हा नदीच्या महापुरात चक्क एक विहिरीच वाहून गेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Loading...

दरम्यान, सध्या नदीतून 90 हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. तसेच पुणे शहराच्या दक्षिण भागामध्ये बुधवारी रात्री पाच – सहा तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे कात्रज, सहकारनगर, बिबवेवाडी, सिहगड रस्ता परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते.

अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी

पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती या पाच तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शुक्रवार दि. 27 सप्टेंबर, 2019 रोजी सुट्टी घोषित केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?