सर्व समाज घटकांचा विश्वास जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाचे स्वागत – रामदास आठवले

रामदास आठवले

मुंबई : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधीमंडळात आज सादर केलेला महाराष्ट्राचा सन २०१९-२० चा अतिरिक्त अर्थसंकल्प हा स्वागतार्ह अर्थसंकल्प असून सर्व समाज घटकांचा विश्वास जिंकणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.

Loading...

दुष्काळ निवारणासाठी ६ हजार कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. जलसंपदा खात्यासाठी १२५९७ कोटी, सुक्ष्म सिंचनासाठी३५०कोटी, कृषी सिंचन योजनेसाठी १५३० कोटी, रस्ते विकास साठी ४२४५ कोटी, अशी महत्वपूर्ण तरतूद या अर्थसंकल्पात आहे.
दुष्काळ निवारण आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विविध तरतुदी या अर्थसंकल्पात आहेत.सहकारी कर्जाचे पुनर्गठण शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती ; कृषिपंप विजबिलात सूट, शालेय महाविद्यालयिन विद्यार्थ्यांचे शुल्क माफ, पिण्याच्या पाण्याचा टँकरद्वारे पाणीपुरवठा असे महत्वपूर्ण निर्णय या अर्थसंकल्पात मांडण्यात आलेले आहेत. दलित, आदिवासी, शेतकरी, महिला सर्व समाज घटकांना आणि कोकणातील काजू उत्पादकांना दिलासा देणारा काजू प्रक्रिया उद्योगासाठी १०० कोटींची तरतूद करून प्रादेशिक समतोल साधणारा आणि सर्व समाज घटकांचा विश्वास जिंकणारा अर्थसंकल्प असल्याचे सांगत रामदास आठवलेंनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.Loading…


Loading…

Loading...