पुणे : जिल्हयातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्राच्या परिसरात कायदा व सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी मतदानाचे दिवशी शिरुर, वेल्हा, आंबेगाव, जुन्नर, दौंड, इंदापूर व बारामती तालुक्यातील आठवडे बाजार भरविण्याबाबत मनाई आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
शिरुर तालुक्यातील मदनगाव फराटा, पाबळ, वेल्हा तालुक्यातील वेल्हे बु., आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव, जुन्नर तालुक्यातील आळे, निमगांव सावा, दौंड तालुक्यातील यवत, इंदापूर तालुक्यातील रुई व निरगुडे तसेच बारामती तालुक्यातील सांगवी गावामधील आठवडे बाजार भरविण्यास मनाई करण्यात आली आहे.
त्यापुढील शुक्रवार दिनांक 22 जानेवारी 2021 रोजी पासून आठवडे बाजार पूर्ववत भरविण्यात यावेत, असेही आदेशाद्वारे कळविण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- हे पण आम्हीच केले…औरंगाबादमध्ये रंगली सेना- काँगेसमध्ये श्रेयवादाची लढाई
- परिसराची स्वच्छता हाच बर्ड फ्ल्यू टाळण्याचा मंत्र
- ‘धनंजय मुंडे यांनी त्वरित राजीनामा द्यावा,अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा राज्यभर आंदोलने करणार’
- ज्यांचा कोरोना लसीवर विश्वास नाही त्यांनी पाकिस्तानात निघून जावे; भाजप नेत्याचा अजब सल्ला
- कोरोनाचे संकट दूर होऊ दे…सोलापूरचे वैभव पुन्हा येऊ दे; भरणे यांचे सिद्धरामेश्वरांकडे साकडे