CET परीक्षेच्या रजिस्ट्रेशनसाठीची वेबसाईट बंद; विद्यार्थी, पालक संतप्त

cet

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता अकरावी ‘सीईटी’ अर्जासाठी उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अडथळा निर्माण झाला असून या गलथान कारभारावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, 21 ऑगस्ट रोजी अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी http://cet.mh-ssc.ac.in/ हे संकेतस्थळ ज्यावर विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरत होते ते तांत्रिक कारणास्तव बंद ठेवण्यात आले असून अर्ज भरण्याची ऑनलाइन सुविधा पूर्ववत सुरू झाल्यानंतर संबंधितांना अवगत करण्यात येईल, असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अकरावी सीईटी परिक्षेचा ऑनलाइन अर्ज भरला नाही किंवा भरत असताना तांत्रिक अडचणी आल्या असतील त्यांना तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पुरेसा कालावधी सुद्धा देण्यात येईल असे देखील बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, पहिल्या दिवशी मंगळवारी 1 लाख 28 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यानंतर बुधवारी विद्यार्थ्यांना बऱ्याच अडचणी येत आहेत. ‘सीईटी’बाबत येणाऱ्या अडचणीसंदर्भात मार्गदर्शनासाठी विभागीय मंडळ निहाय हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. यासाठी विभागीय मंडळनिहाय सहसचिव, सहायक सचिव यांचे भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मात्र, या अधिकाऱ्यांची सतत येत असलेल्या फोनमुळे डोकेदुखी वाढली असून या अधिकाऱ्यांनी फोन स्वीच ऑफ करून ठेवले आहेत अशी देखील माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP