Urfi Javed | उर्फीच्या जीवाला कुणापासून धोका? महिला आयोगाकडे केली तक्रार

 उर्फी जावेद (Urfi Javed) आणि चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यामधील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

या दोघींचा वाद कधी पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचत आहे, तर कधी महिला आयोगाकडे जात आहे.

चित्रा वाघ मला जीवे मारण्याची धमकी देत आहे, असं म्हणत उर्फीने चित्रा वाघ यांच्याविरुद्ध महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.

"मी तिला धमकी नाही तर उघडी-नागडी फिरू नको असा थेट इशारा दिला आहे. मी तिला जीवे मारण्याची धमकी का देऊ?", असं म्हणतं चित्रा वाघ यांनी आपली बाजू मांडली आहे.

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्या वादामध्ये सामाजिक कार्यकर्ते तृप्ती देसाई (Trupti Desai) यांची एन्ट्री झाली आहे.

उर्फी मुस्लिम असल्यामुळे तिच्यावर बंधन घातली जात आहे, असं त्या म्हणाल्या आहेत.

तृप्ती देसाई यांच्या वक्तव्यानंतर या वादाला विचित्र वळण आले आहे.