Oscar 2023 | ‘द काश्मीर फाइल्स’ पोहोचला ऑस्करला, चित्रपटातील ‘हे’ कलाकार झाले शॉर्टलिस्ट

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट 2022 मध्ये यशस्वी ठरला होता.

चित्रपट काश्मिरी पंडितांच्या नरसंहारावर आधारित आहे. सध्या या चित्रपटाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

हा चित्रपट ऑस्कर 2023 (Oscar 2023) साठी शॉर्टलिस्ट झाला आहे.

भारतातून ऑस्करसाठी पाच चित्रपट निवडले गेले आहे.

'द काश्मीर फाईल' या चित्रपटासोबतच या चित्रपटातील कलाकार देखील ऑस्कर 2023 साठी निवडण्यात आले आहे.

पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार आणि अनुपम खेर या कलाकारांचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या श्रेणीमध्ये निवड करण्यात आली आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.