Jasprit Bhumrah | टेस्ट मॅच महत्वाची की IPL?, बुमराहने ‘या’ कसोटीतून घेतली माघार

भारत आणि श्रीलंका यांच्यामधील पहिला एकदिवसीय सामना सुरू होण्याआधीच जसप्रीत बुमराह (Jasprit Bhumrah) माघार घेतली.

दुखापतीनंतर तो या मालिकेमध्ये पुनरागमन करणार होता.

मात्र, मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी तो संघातून बाहेर पडला आहे.

3 जानेवारी रोजी त्याला संघात  स्थान मिळाले होते. त्यानंतर अवघ्या सहा दिवसांत तो पुन्हा संघातून बाहेर पडला.

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,"बुमराहची न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी संघात निवड केली जाणार नाही.

बुमराह न्यूझीलंडविरुद्ध आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेमध्ये अनुपस्थित राहू शकतो.

तो आयपीएलला देशापेक्षा जास्त प्रधान्य देत आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.