Rakhi Sawant | राखी सावंतने बांधली लग्नगाठ? बॉयफ्रेंड आदिलसोबत वरमाळा घातलेले फोटो झाले व्हायरल

बॉलीवूडमधील ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) सतत चर्चेत असते.

सध्या राखी सावंत आणि तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्राणी यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहे.

कारण या दोघांनी गळ्यात वरमाळा घातलेले फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या लग्नाविषयी राखी किंवा आदिलकडून कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

या दोघांचा मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आदिल राखीपेक्षा वयाने सहा वर्षांनी लहान आहे.

त्याच्याबद्दल एका मुलाखतीमध्ये राखी सावंत बोलताना म्हणाली होती, "देवाने आदीला माझ्यासाठी पाठवल आहे."