Rakhi Sawant | "मी इस्लाम कबूल..." ; आदिलसोबत लग्न केल्यानंतर राखीने केला मोठा खुलासा

बॉलीवूडची राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे

तिने तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीसोबत इस्लाम पद्धतीने लग्न केलं आहे.

सात महिन्यापूर्वी या दोघांनी लग्न केलं होतं. मात्र, त्याबद्दल त्यांनी कुणालाही सांगितलं नव्हतं.

बिग बॉस मराठीच्या घराबाहेर आल्यानंतर राखीने तिच्या लग्नाचा खुलासा केला होता.

राखी सावंतने आदिलशी लग्न केल्यानंतर इस्लाम धर्म स्वीकारण्याची कबुली दिली आहे.

ती म्हणाली, "मी आदिलला आणि त्यांनी मला कबूल केलं आहे. आमच्या प्रेमामध्ये कोणताही धर्म नाही. आम्ही निकाह केला आहे."

पुढे बोलताना ती म्हणाली,"लग्नानंतर आदिलने माझं नाव फातिमा ठेवलं आहे. मी हे नाव आणि इस्लाम धर्म दोन्हीही स्वीकारलं आहे."