Shehzada Trailer | बॉलीवूडने पुन्हा खाल्ली माती; अल्लु अर्जुनच्या सुपरहिट सिनेमाचा केला कचरा

अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.

यावेळी त्याचा आगामी चित्रपट 'शेहजादा' (Shehzada) चर्चेचे कारण बनला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून चाहते या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट बघत होते.

चाहत्यांची ही प्रतीक्षा संपलेली असून या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर पाहताच नेटकऱ्यांनी त्यावर टीका करायला सुरुवात केली आहे.

बॉलिवूडने पुन्हा एकदा अल्लु अर्जुनच्या सुपरहिट चित्रपटाचा कचरा केला आहे, असं देखील नेटकऱ्यांकडून म्हटलं जात आहे.

हा चित्रपट अल्लु अर्जुनच्या अला वैकुंठपुरमलो (Ala Vaikunthapurramuloo) या चित्रपटाचा बॉलीवूड रिमेक आहे.

'शेहजादा' या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित धवन यांनी केले आहे.