Sharad Pawar | शरद पवार यांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट! उजव्या डोळ्यावर होणार शस्त्रक्रिया

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या तब्येतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये पुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या उजव्या डोळ्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

शरद पवार यांना उद्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे.

डॉक्टरांनी त्यांना 18 जानेवारीपर्यंत घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.

शरद पवार यांच्या एका डोळ्यावर आधी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

आता पुन्हा त्यांच्या दुसऱ्या डोळ्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यासाठी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येणार आहे.