Eknath Shinde | “सध्याचे मुख्यमंत्री भ्रष्टाचारी…” ; आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप

Eknath Shinde | गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता सत्तासंघर्षाचा निकालाला काहीच तास राहिले असताना युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray) यांनी देखील राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. भेटीदरम्यान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भ्रष्टाचारी आहेत : आदित्य ठाकरे

आज (10 मे) आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली. या भेटीबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. तीन घोटाळ्यांची माहिती राज्यपालांना दिली आहे. जेव्हापासून हे खोके सरकार सत्तेत आलं आहे तेव्हापासून फक्त भ्रष्टाचार सूरु आहे. या बिल्डर कॉन्ट्रक्टरच्या सरकारने मुंबईत सहा हजार कोटींचा रस्त्याचा घोटाळा केला आहे. याबाबत अनेक दिवसांपासून अनेक नगरसेवकांनी तक्रार केली आहे. परंतु या प्रकरणी कारवाई करण्यात आली नाही. यामुळे आम्हाला अशी पावलं उचलावी लागली आहेत. अनेक वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना चर्चेला बोलवण्यात आलं परंतु त्यांनी काहीच दखल घेतली नाही. सध्याचे मुख्यमंत्री भ्रष्टाचारी आहेत. असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

(Aditya Thackeray Commented On Eknath Shinde)

दरम्यान, आदित्य ठाकरेंनी सत्ताधारी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत म्हटलं की, काही काम १६० कोटींची होती परंतु सत्ताधारी सरकारनं ही काम २६३ कोटींना दिली. तसचं एकनाथ शिंदेंनी जेवढी काही काम जास्त बजेटची आहेत त्या कामाचं कंत्राट जवळच्या लोकांना दिले आहे, यामुळे या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांना केली आहे. याचप्रमाणे जेव्हा – जेव्हा आम्ही याबाबत प्रश्न उपस्थित करतो? याबाबत चर्चा करू अस म्हणतो तेव्हा- तेव्हा ते कधी शेतात तर कधी गुवाहाटीला पळून जातात. असा टोला आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-