Weather Update | राज्यात तापमानाचा पारा घसरला, ‘या’ ठिकाणी थंडीची लाट

Weather Update : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यामध्ये अचानक थंडीत (Cold) वाढ झाली आहे. राज्यात पुणे आणि जळगाव शहराच्या तापमानामध्ये अचानक घट झाल्याचे दिसून आले आहे. पुण्यातील तापमान 10.30 अंश सेल्सिअसवर येऊन पोहोचले आहे. राज्यामध्ये पुढील आठ दिवस ही थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान ( Weather Update Maharashtra ) विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमधील काही भागात वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव गेल्या दोन दिवसापासून वाढला आहे. त्यामुळे या भागात थंडी आणि धुके वाढले आहे. उत्तरेकडून राज्याकडे थंड वारे वाहत आहे. परिणामी राज्यात पुन्हा एकदा थंडी वाढली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये तापमानाचा पार 7.7  अंश सेल्सिअसवर येऊन पोहोचला आहे.

Weather Update Maharashtra | Pune, Maharashtra, India Weather Forecast

जळगावमध्ये गेल्या 24 तासात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. या ठिकाणी 7.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. तर, पुण्याचा पारा देखील 10 अंश सेल्सिअसच्या खाली येऊन पोहोचला आहे. त्यामुळे या ठिकाणी थंडी पुन्हा वाढली आहे. अचानक वाढलेल्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

जळगाव, पुण्यासह औरंगाबादचे तापमान देखील 10 अंश सेल्सिअसच्या खाली आले आहे. तर, राज्यातील उर्वरित ठिकाणी तापमानात ( Weather Update Maharashtra ) घसरण झाल्याचे दिसून आले आहे. राज्यात रत्नागिरीमध्ये उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. रत्नागिरीमध्ये 35.46 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे.

Weather Update winter wave will disapper soon read rain predictions latest Marathi news

विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये थंडी काही अंशी कमी होणार असून, पश्चिमी झंझावातामुळं इथंही वातारणात काही बदल अपेक्षित आहेत. फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण देशात सरासरी 89 ते 122 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं सरासरी 27.2 टक्के इतका पाऊस या महिन्यात होऊ शकतो. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसतील. तर, गुजरातमध्येही पावसाची हजेरी असेल

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.