Weather Update | राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, पाहा हवामान अंदाज

Weather Update, Heat wave warning in the state

Weather Update | राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

Weather Update | राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: यावर्षी उन्हाळ्यात म्हणजेच मार्च ते मे महिन्यादरम्यान महाराष्ट्रात कमाल तापमानाचा (Temperature) पारा सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात सरासरी एवढेच, मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी, तर कोकणामध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

फेब्रुवारी महिन्यात किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त (Minimum temperature in February is above average)

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात किमान तापमान (Weather Update) सरासरीपेक्षा जास्त होते. 1901 पासूनच्या नोंदणी नुसार, सरासरीपेक्षा अधिक किमान तापमानात यावर्षीचा फेब्रुवारी महिना पाचव्या क्रमांकावर येऊन पोहोचला आहे. फेब्रुवारी महिन्यात देशात सरासरी 16.31 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत 2016 मध्ये सर्वाधिक म्हणजेच 16.82 अंश सेल्सिअस सरासरी किमान तापमान नोंदवण्यात आले आहे.

दरम्यान यावर्षी मार्च ते मे महिन्यादरम्यान वायव्य, पूर्व, ईशान्य आणि मध्य भारताच्या बहुतांश ठिकाणी कमाल तापमान (Weather Update) सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, देशाच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर वायव्य आणि मध्य भारतामध्ये उष्णताची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

मार्च महिन्यामध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर राज्यातील उर्वरित भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून (Weather Update) देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

Exit mobile version