मोठी बातमी : कारमधे एकटे असाल तरीही मास्क बंधनकारक, दिल्ली हायकोर्टाचा निर्णय

car mask

नवी दिल्ली : दिवसेंदिवस कोरोना रुग्णवाढ झपाट्याने वाढत आहे. आता देशाची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. भारतात कोरोना रुग्णवाढीचा नवा उच्चांक नोंदवला गेला आहे. गेल्या 24 तासांत देशात 1,15,736 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. याआधी 5 एप्रिलला पहिल्यांदाच एक लाखांचा टप्पा पार करत सर्वाधिक रुग्णवाढ झाली होती. यासोबत देशातील रुग्णांची एकूण संख्या 1,28,01,785 इतकी झाली आहे. गेल्या वर्षी १७ सप्टेंबरला देशात 97 हजार 894 रुग्णांची नोंद झाली होती. कोरोनाकाळातील ही एका दिवसातील सर्वाधिक रुग्णवाढ होती. मात्र, आता महाराष्ट्रासह अन्य राज्यांत वेगाने कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. त्यामुळे नवीन कोरोना रुग्णांची भर पडल्याने हा नवा उच्चांक नोंदवण्यात आला आहे.

अशावेळी दिल्ली हायकोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कारमध्ये तुम्ही जरी एकट्याने प्रवास करत असाल तरी देखील मास्क वापरणे अनिवार्य असेल. यासंदर्भात दाखल एका याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे. दिल्ली हायकोर्टाने चारचाकी एक पब्लिक प्लेस आहे असे म्हटले, अशावेळी मास्क वापरणे अनिवार्य असेल.

दिल्ली उच्च न्यायालयाने यासंदर्भातील एका याचिकेवर सुनावणी करताना असे म्हटले आहे की, कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी मास्क एकप्रकारे सुरक्षा कवच आहे. मास्क तो परिधान करणाऱ्या व्यक्तीचीही सुरक्षा करतं, त्याचप्रमाणे त्याच्या समोर असणाऱ्या व्यक्तीची देखिल सुरक्षा करते . मास्क हा असा उपाय आहे ज्यामुळे लाखो लोकांचा जीव वाचला आहे, असे दिल्ली हायकोर्टाने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या