परपुरुषांच्या हातून बांगड्या भराल तर खबरदार …

टीम महाराष्ट्र देशा- मुस्लीम महिलांच्या बाबतीत अनेक अन्यायकारक फतवे काढण्यासाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या दारूल उलूम देवबंदने आणखी एक वादग्रस्त फतवा काढला आहे. ‘मुस्लिम महिलांनी बाजारात जाऊन अथवा कुठेही परपुरुषाच्या हातून बांगड्या भरणे शरीयतच्या विरोधात आहे. ते हराम आहे, त्यामुळे त्यापासून दूर रहा’ असा खळबळजनक फतवा उत्तर प्रदेशातील दारूल उलूम देवबंदने जारी केला आहे.

‘बांगड्या विकण्याचे बहुतेक काम मनिहार जातीचे लोक करतात. महिलांना बांगड्या भरण्यासाठी घरातून बाहेर पडावे लागते आणि बांगड्या भरताना परक्या पुरुषाच्या हातात हात द्यावा लागतो. त्यामुळे परपुरुषाच्या हातून बांगड्या भरणे योग्य आहे का?’ असा लिखित सवाल देवबंदच्या एका सदस्याने केला होता. त्यावर देवबंदने फतवा काढून परपुरुषाच्या हातून बांगड्या भरणे हराम असल्याचं म्हटलं आहे.

काय आहे नवा फतवा?

‘परपुरुषाने अनोळखी महिलांना बांगड्या भरणे अनैतिक असून हा गुन्हा आहे. परपुरुषांच्या हातून बांगड्या भरण्यासाठी स्त्रियांनीही घराच्या बाहेर पडणं मना आहे. तो सुद्धा गुन्हाच आहे. अशा गुन्ह्यापासून दूर राहण्याचा महिलांनी प्रयत्न करावा,’ असं या फतव्यात म्हटलं आहे.

You might also like
Comments
Loading...