अनारकली ड्रेस परिधान करून सुखदाने वेधले चाहत्यांचे लक्ष…

sukhada

मुंबई : ‘आभास हा’, ‘घरकुल’ यासारख्या मालिकेतून मराठी सिनेसृष्टीत झळकणारी अभिनेत्री म्हणजे सुखदा खांडकेकर होय. तिची अनोखी स्टाईल नेहमी चर्चेत असते. तिचे फोटोशूट्स बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सदैव पारंपारिक अंदाजातील फोटो शेअर करून ती चाहत्यांचे लक्ष वेधत असते.

नुकतीच अभिनेत्रीने शेअर केलेली एक पोस्ट आणि सोबतच त्यावर तिचा पती अभिजित खांडकेकरने केलेली कमेंट बरीच चर्चेत आली आहे. सुखदाने तिचा एक फोटो शेअर केला आहे. यात तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या अनारकली ड्रेसमध्ये सुखदा खूपच सुंदर दिसत आहे. वास्तविक हा फोटो एका स्टेज परफॉर्मन्स दरम्यानचा आहे.

या फोटोवर अभिजित खांडकेकरने केलेली कमेंट तसेच हार्ट ईमोजी पोस्ट केल्याने सर्वांचे लक्ष वेधत आहे. सुखदा आणि अभिजित हे सिनेसृष्टीतले रोमँटिक जोडपे आहे. बऱ्याचदा हे जोडपे त्यांचे कपल फोटोशूट शेअर करत असते. सुखदाने ‘आभास हा’, ‘घरकुल’ यासारख्या मालिकेमध्ये दिसली आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’मध्ये तिने मल्हाररावांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. याशिवाय सुखदा ‘बाजीराव मस्तानी’ या हिट चित्रपटात देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसली होती. सुखदाच्या या फोटोवर चाहत्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व कमेंट्स दिसत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या