fbpx

भाजपा नेत्याच्या घरातील शस्त्रसाठ्याने देशात खळबळ; १३ पिस्तुल, १७ देशी बॉम्ब, ११६ जिवंत काडतुसे जप्त

भोपाळ – मध्य प्रदेशातील भारतीय जनता पार्टीचे नेते संजय यादव यांच्या घरावर मध्य प्रदेशपोलिसांनी धाड टाकली. या धाडीमध्ये पोलिसांकडून संजय यादव यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे देशात एकाच खळबळ उडाली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेत्याच्या घरात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडल्याने भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे. सध्या संपूर्ण देशात सुरक्षा यंत्रणांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. पोलीस यंत्रणांही अनेक ठिकाणी बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

मध्य प्रदेश पोलिसांकडून राज्यभरात विविध ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे. सोमवारी पोलीस अधिक्षक यांगचेन डी भूटिया यांच्या टीमला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संजय यादव यांच्या घरावर धाड टाकण्यात आली. या धाडीमध्ये संजय यादव यांच्या घरातून १३ पिस्तुल, १७ देशी बॉम्ब आणि ११६ जिवंत काडतुसे जप्त आली आहेत.

पोलिसांनी आरोपी संजय यादवविरोधात अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. संजय यादव यांच्यासोबत त्याचा सहकारी गोपाळ जोशी याच्यावरही पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.