आम्ही शेवटपर्यंत एसटी कामगारांसोबत-सदाभाऊ खोत

आम्ही शेवटपर्यंत एसटी कामगारांसोबत-सदाभाऊ खोत

सदाभाऊ खोत

मुंबई : आज परिवहन मंत्री अनिल परब, भाजपा आमदार पडळकर, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळात सह्याद्री अतिथीगृहावर महत्वपूर्ण चर्चा होणार आहे. कालच्या झालेल्या बैठकीत सरकारकडून अंतरिम पगारवाढीचा प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावाबाबत पडळकर आणि खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आज ते भूमिका स्पष्ट करणार आहेत.

याबाबत सदाभाऊ खोत म्हणाले, या सरकारने गेल्या अनेक वर्ष एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय केलेला आहे. त्यामुळे या सरकारवरचा विश्वास संपुष्टात आला आहे. एसटीचे विलीनीकरण झाल्यास एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत होईल ही रास्त मागणी या कर्मचाऱ्यांची आहे. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना सोयीसुविधा मिळतील, ही मागणी चुकीची नाही.

सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर मैदानातला सैनिक आहे. आम्ही कधीही मागे हटणार नाही. कामगार आमच्या जवळचा आहे. न्याय मागायचा तर ते कुणाकडे जातील महाविकास आघाडीकडे जातील का. महाविकास आघाडी सरकार एसटी कर्मचाऱ्यांवर पोलिसांना गोळ्या घालायला सांगतील. मी चर्चेला जाणार. चर्चा होणार. चांगला मार्ग निघाला तर मार्ग काढणार. हा प्रश्न कामगारांचा आहे. तसेच महाराष्ट्राच्या प्रवासी जनता व विद्यार्थ्यांचा सुद्धा आहे. असेही सदाभाऊ खोत यावेही म्हणाले.

महत्वाच्या बातम्या